Solapur: डब्ल्यूआयटीच्या 150 किलोवॅट हायड्रॉलिक टेस्ट स्टँडमुळे संशोधनाला चालना

वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे 150 किलोवॅट क्षमतेच्या अत्याधुनिक हायड्रॉलिक टेस्ट स्टँडच्या स्थापनेमुळे संशोधन व प्रायोगिक शिक्षणाला मोठी चालना मिळणार आहे.
Solapur: डब्ल्यूआयटीच्या 150 किलोवॅट हायड्रॉलिक टेस्ट स्टँडमुळे संशोधनाला चालना
Published on
Updated on

सोलापूर : वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे 150 किलोवॅट क्षमतेच्या अत्याधुनिक हायड्रॉलिक टेस्ट स्टँडच्या स्थापनेमुळे संशोधन व प्रायोगिक शिक्षणाला मोठी चालना मिळणार आहे.

डॅनफॉस इंडस्ट्रीज, पुणे यांच्या सहकार्याने ही सुविधा उभारण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना उद्योगमानक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल. उच्च क्षमतेच्या हायड्रॉलिक पंप्स आणि मोटर्सची अचूक चाचणी करण्यासाठी सज्ज असलेली ही यंत्रणा सोलापूर व परिसरात एकमेव मानली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचा थेट अनुभव घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण केवळ सैद्धांतिक ज्ञानापुरते मर्यादित न राहता, प्रत्यक्ष औद्योगिक कौशल्यांशी जोडले जात आहे. हायड्रॉलिक सिस्टीम्स, औद्योगिक ऑटोमेशन, ऊर्जा कार्यक्षमता आणि उच्च दाब तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांची कौशल्यवृद्धी आणि संशोधन क्षमतेत मोठी भर पडणार आहे. या महत्त्वकांक्षी प्रकल्पाच्या उभारणीत डॅनफॉस इंडस्ट्रीजमधील तज्ज्ञांचे मोलाचे योगदान लाभले. राहुल वळे, मनोज घोडमारे, भाग्येश जगताप, सचिन कामाटी आणि राजेश जाधव यांच्या तांत्रिक मार्गदर्शनामुळे ही सुविधा यशस्वीरीत्या साकार झाली आहे.

महाविद्यालयातील मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. भाग्येश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही सुविधा कार्यरत राहणार आहे. या प्रकल्पासाठी वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी, विश्वस्त वैभव गांधी, भूषण शहा, पराग शहा तसेच प्राचार्य सचिन गेंगजे यांच्या दूरदृष्टीमुळे महाविद्यालयात आधुनिक तंत्रज्ञानाधारित प्रयोगशाळा उभारणीला गती मिळाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news