

सोलापूर : तू शेतात कधीच येत नाही आज कशी आलीस, असा जाब विचारल्यानंतर पती पत्नीमध्ये वाद झाला. या वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात फरशी घालून खून केल्याची घटना दक्षिण तालुक्यातील हत्तूर येथे गुरूवारी (दि.24) रोजी घडली.
गौराबाई नीलकंठ पाटील (वय 60, रा. पाटील गल्ली, हत्तूर) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. गौराबाई शेतात येत नव्हत्या परंतु अमावस्येनिमित्त पूजा करण्यासाठी गुरूवारी हत्तूर ते आनंदनगर दरम्यान असलेल्या शेतात गेल्या. पती नीलकंठ पाटील (69) यांनी तिच्याशी वाद घातला. त्यातून त्यांनी गौराबाई यांच्या डोक्यात फरशी घालून खून केला. आरोपी हा तेथेच बसून होता. माहिती कळताच पोलिस घटनास्थळी गेले. मुलगा आमसिध्द यांच्या फिर्यादीवरून नीलकंठ पाटील याच्यावर विजापूर नाका पोलिसात गुन्हा दाखल झाला.