Solapur News : सोलापूरचा पाणीपुरवठा आता पाच दिवसांआड

महापालिका प्रशासनाकडून नियोजनात ढिसाळपणा
Water Crisis
पाणीपुरवठाFile Photo
Published on: 
Updated on: 

सोलापूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन मुख्य जलवाहिन्या नादुरुस्त झाल्याने मंगळवार, दि. २९ रोजीपासून शहरातील चार दिवसांआडचे पाणीपुरवठ्याचे रोटेशन एक दिवसाने पुढे जाईल. आता पाणीपुरवठा पाच दिवसांआड होणार आहे.

सोरेगाव ते जुळे सोलापूर एचएसआरदरम्यानची १२०० मिलिमीटर व्यासाची मुख्य पंपिंग जलवाहिनी सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्र परिसरात नादुरुस्त झाली आहे. त्याचबरोबर जामगुंडे मंगल कार्यालयाच्या पाठीमागे रेल्वे ट्रॅकजवळ शहरांतर्गत पाणीपुरवठा करणारी ७६२ मिलिमीटर व्यासाची मुख्य पिण्याच्या पाण्याची जलवाहिनीही नादुरुस्त झाली आहे. या दोन्ही जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम सोमवार (दि. २८) पासून सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे उजनी, भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्र आणि सिव्हिल हॉस्पिटलजवळील हायलेव्हल टाकीवर अवलंबून असलेल्या शहराच्या भागातील पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता वेंकटेश चौबे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news