

सोलापूर : सोलापूर विजयपुरा हा राष्ट्रीय महामार्ग हत्तूर पासून पुढे बांधा वापरा हस्तांरण करा या योजनेतून झाला आहे. खासगीकरणातून झालेल्या झालेला हा रस्ता ठिकठिकाणी खचलेला आहे. या खचलेल्या रस्त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहेत. या अपघातात अनेकांनी जीव गमवावे लागला आहे. तर काहींना अपंगत्व आला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वरीष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालून या रस्त्याची दर्जेदार दुरुस्ती करावी, अशी मागणी सर्वच स्तरातील वाहनचालकांमधून केला जात आहे.
सोलापूर-विजयपुरा हा शंभर किलोमीटर अंतराचा राष्ट्रीय महामार्ग आहे. याचे काही दिवसांपूर्वी चौपदरीकरण करण्यात आले. हत्तूर, वडकबाळ, बसवनगर, नांदणी आणि टाकळी या दरम्यान आणि तसेच ते पुढे कर्नाटकातदेखील ठिकठिकाणी हा रस्ता खचला आहे. काही ठिकाणी तर किमान पाच ते सहा इंचपर्यंत खचला आहे. यापूर्वी त्याची दुरुस्ती केले; पण ती जुजबी दुरुस्ती झाली. पुन्हा ‘जैसे थे’ हा रस्ता खचला. दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना वाहन चालवताना अडचणी येत आहेत. महामार्गाच्या दोन्ही बाजूला रस्ता खचण्याचे प्रमाण वाढला आहे. खचलेल्या रस्त्यामुळे दुचाकीस्वारांना आपली दुचाकी चालवणे अवघड झाले आहे.
दुचाकी चालवत असताना खचलेल्या ठिकाणी दुचाकीचा तोल जातोच. या रस्त्यावरून मंद्रुप, औराद, नांदणी, टाकळी आणि माळकवठे यासह अन्य गावांतील प्राथमिक महिला शिक्षिका आणि आरोग्य विभागातील महिला कर्मचारी नेहमीच ये-जा करतात. त्यांना या खचलेल्या रस्त्याचा नाहक त्रास होत आहे. त्यांचा तोल गेला की अपघाती परिस्थिती निर्माण होते. चौपदरी रस्ता झाल्यापासून अपघात कमी होण्याऐवजी वाढलेली आहेत. हलक्या वाहनांच्या अपघातात वाढ झालेलीच आहेत.असे घटना टाळण्यासाठी हा महामार्ग ज्या ज्या ठिकाणी खचला आहे. त्याची उच्च दर्जाची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी सर्वच स्तरांतील वाहनचालकांकडून केली जात आहे. या रस्त्यावरील अपघाती घटना टाळण्यासाठी महामार्ग प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष घालावी आणि त्यात सुधारणा करावी, अशी मागणी होत आहे.