Solapur Bribery Case : दहा हजारांची लाच मागणारा वैरागचा हवालदार ताब्यात

मुलाविरुद्ध दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी मागितली लाच
Bribery Case
Bribery Casefile photo
Published on: 
Updated on: 

बार्शी : मुलाविरुद्ध दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी १० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी वैराग पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार संदेश कृष्णदेव पवार याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेली माहिती अशी, शेतकरी असलेल्या तक्रारदाराच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मदत करतो असे सांगून पोलीस हवालदार संदेश पवार याने एक लाखांची मागणी केली होती. तक्रारदाराने रक्कम देणे शक्य नसल्याचे सांगितल्यानंतर २० हजार रुपये मागितले, तडजोडीअंती १० हजारांवर मागणी केली.

तक्रारदाराने दि. २८ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर येथे तक्रार दिली. त्यानुसार विभागाने त्याच दिवशी दुपारी १.४० ते ३.३७ या वेळेत वैराग पोलीस स्टेशन येथे पडताळणी केली. त्यात हवालदार पवार यांनी सुरुवातीला २० हजार आणि तडजोडीअंती १० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दि. २८ सप्टेंबर व ९ ऑक्टोबर रोजी वैराग पोलीस स्टेशन येथे सापळा रचला. मात्र आरोपीला संशय आल्याने त्याने लाचेची रक्कम स्वीकारली नाही. त्यामुळे लाचलुचपत विभागाने वैराग पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news