

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ येथील कट्ट्यव्वा देवी गोशाळेमध्ये 92 गोवंश तीन दिवसांपासून पुरामध्ये अडकले होते. विश्व हिंदू परिषद बजरंग दल गोरक्षकांनी त्यांची सुरक्षित सुटका करून त्यांना पर्यायी व्यवस्था केली. तसेच भुस्सा, चारा, गुळ आणि औषधोपचाराची सुविधा पुरवली.
वडकबाळ येथून बंद ठेवण्यात आलेली सोलापूर- विजयपुरा महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाल्यानंतर पुरातून सुटका केलेल्या 92 गोवंशाना तातडीने सोरेगाव येथील गोकुलेश गोशाळेत हलवण्यात आले. गोवंशांना सतत पावसामुळे त्रास होत होता. शिवाय त्यांना निवाराही नव्हता. त्यांची प्रकृती खालावत गेली होती. त्यामुळे विश्व हिंदु परिषद बजरंग दल गोरक्षकांनी तातडीने मदत कार्य हाती घेतले.
कट्ट्यव्वा देवी गोशाळेचे प्रमुख रूद्रप्पा बिराजदार आणि उमाताई बिराजदार यांना पुढील गंभीर परिस्थितीबाबत कल्पना दिली. जिल्हा आपत्ती नियोजन समितीकडून गुरेवाहक गाडी उपलब्ध केली. बजरंग दल जिल्हा सहसंयोजक अभय कुलथे, शुभम साठे,महेश भंडारी, विजय यादव,यशवंत सुर्वे, सुमित सुगंधी, आदित्य चिप्पा, वीरु मांचाल, गोसुरक्षा सहसंयोजक अविनाश कैय्यावाले, पवन कोमटी, पवन बल्ला, अनिल कोळी, प्रीतम कलबुर्गीवाले, अभिजीत कलबुर्गीवाले, अभिजीत जिन्दे, अनिकेत, रोहन सरवदे, प्रज्वल पवार तसेच पंढरपूर, मोडनिंब, कामती येथील गोरक्षक, बजरंग दलाचे 25 पेक्षा अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.