Solapur University: सोलापूर विद्यापीठाचा 490.35 कोटींचा अर्थसंकल्प

सोलापूर विद्यापीठाच्या आगामी शैक्षणिक वर्षासाठी 490 कोटी 35 लाख 62 हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास अधिसभेने दुरुस्तीसह एकमताने मंजुरी दिली
Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University |
Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur UniversityPudhari Photo
Published on
Updated on

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या आगामी शैक्षणिक वर्षासाठी 490 कोटी 35 लाख 62 हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास अधिसभेने दुरुस्तीसह एकमताने मंजुरी दिली.

430 कोटी 74 लाख 98 हजार रुपये इतकी अपेक्षित जमा गृहीत धरून सादर करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पात 59 कोटी 60 लाख 64 हजार रुपयांची तूट दर्शविण्यात आली आहे. विद्यार्थी विकास, संशोधन आणि नवोपक्रमांना यंदा विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्यासह अधिसभेचे सदस्य उपस्थित होते. प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांनी सदस्य सचिव म्हणून काम पाहिले. वित्त व लेखा अधिकारी सीए डॉ. महादेव खराडे यांनी अंदाजपत्रक सादर केले.

अंदाजपत्रकाची मांडणी देखभाल-दुरुस्ती, वेतन, ऋण व अनामत, विकास योजना भाग-1 (शासन अनुदान) आणि विकास योजना भाग-2 (विद्यापीठ निधी) अशा पाच टप्प्यांत करण्यात आली. सादरीकरणानंतर सदस्यांनी सविस्तर चर्चा करून काही दुरुस्त्या सुचवल्या. त्यानंतर अंदाजपत्रकास एकमताने मंजुरी देण्यात आली.

यावेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, प्रा. सचिन गायकवाड, डॉ. प्रशांत पवार, महादेव कमळे, डॉ. समाधान पवार, सिनेट सदस्य डॉ. बी. पी. रोंगे, डॉ. वीरभद्र दंडे, डॉ. भगवान आदटराव, रोहिणी तडवळकर, यतिराज होनमाने, गणेश डोंगरे, अजित संगवे, चन्नवीर बंकुर, डॉ. जैनोद्दीन मुल्ला, ॲड. उषा पवार, सूरज रोंगे, ॲड. मल्लिनाथ शहाबादे, माधव देशपांडे आदी उपस्थित होते.

ठळक तरतुदी

- शिक्षकांच्या संशोधनाला चालना देण्यासाठी ‌‘सीड मनी‌’ उपक्रमासाठी 35 लाख रुपये.

- मुलींच्या उच्च शिक्षणातील प्रमाण वाढवण्यासाठी ‌‘मुली शिकवा, समाज घडवा‌’ उपक्रमासाठी 5 लाख रुपये.

- ‌‘कमवा व शिका‌’ योजनेसाठी 20 लाख रुपये.

- आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागासाठी विशेष निधी.

- शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेसाठी 20 लाख रुपये.

- विद्यार्थी संशोधन शिष्यवृत्ती आणि 40 गरजू विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्यासाठी भरीव तरतूद.

- इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेससाठी विद्यापीठ हिस्सा म्हणून 50 लाख रुपये.

- स्पर्धा परीक्षा अभ्यास कक्ष, विद्यार्थी क्षमता संवर्धन कार्यक्रम, नवीन लेखक-प्रकाशक प्रोत्साहन योजना आणि ‌‘माझे विद्यापीठ‌’ उपक्रमासाठी विशेष निधी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news