UV Rays Awareness: अतिनील किरणे त्वचा व डोळ्यांना अपायकारक

आरोग्याची वेळीच काळजी घेण्याची गरज; अन्य धोके होण्याची शक्यता नाकारता येत नाही
UV Rays Awareness
UV Rays AwarenessPudhari
Published on
Updated on
अमसिद्ध व्हनकोरे

सोलापूर : तीव्र उन्हामुळे वातावरणात अतिनील किरण (अल्ट्राव्हायलेट इंडेक्स) तयार होतात. याचा निर्देशांक हा काहीवेळा १० च्या पुढे जात आहे. या वाढणाऱ्या अतिनील किरणांचा माणसाच्या आरोग्यावर परिणाम होतो. शिवाय, वातावरणातील तापमानाचा अन्य अवयवावरही धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी वातावरणातील उन्हाची तीव्रता पूर्ण कमी होईपर्यंत लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे आहे.

अतिनील किरणांत जास्त वेळ राहिल्याने त्वचेला अकाली वृद्धत्व, सनबर्न, डीएनए नुकसान, मोतीबिंदू व त्वचेच्या कर्करोगाचा धोकाही पोहोचण्याची शक्यता असते. तर सकाळी १० ते ३ यावेळेत घराबाहेर पडणे टाळणे आजही आवश्यक आहे.

वातावरणातील तीव्र उन्हातील अतिनील किरणामुळे डोळे लाल होतात. डोळ्यांची जळजळ होण्याचे प्रमाण वाढते. उन्हाची तीव्रता कमी होईपर्यंत सकाळी १० ते दुपारी ३ यावेळेत सर्वच वयोगटातील नागरिकांनी बाहेर पडणे टाळावे. किरकोळ पावसाच्या सरी बरसल्या तरी तापमान कमी झाले नाही. उन्हाच्या तीव्रतेमुळे अचानक तब्येत बिघडते. अशावेळी तत्काळ तज्‍ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

कडक उन्हाचे पूर्ण दिवस संपेपर्यंत आपल्या घराचे दरवाजे उघडे ठेवा. यामुळे वायुविजन होते. ताक, बेलफळाचा रस व दही व अन्य थंड पेय घ्यावे. आपल्या चारचाकी वाहनांमधील कार्बोनेटेड पेये, परफ्यूम, गॅस साहित्य, लाईटर व बॅटरी असलेली उपकरणे काढावीत. तसेच याशिवाय कारच्या खिडक्या काही वेळ उघड्या ठेवाव्यात. चारचाकीतील इंधनाची टाकी पूर्ण भरू नये. घरातील वीज वापराच्या मीटरवर जास्त भार टाकू नका.

अतिनील किरणांनी डोळ्यांची जळजळ होतो व डोळ्यातून पाणी येते. मोतीबिंदू धोका वाढतो. शिवाय रेटिनाला हानी पोहोचू शकते. रोगप्रतिकारक शक्तीवर जास्त अतिनील किरणांमुळे परिणाम होऊन रोगप्रतिकारक शक्तीही काही प्रमाणात कमी होऊ शकते. यासाठी सकाळी दहा ते चार यावेळेत तीव्र सूर्यप्रकाशात जास्त वेळ थांबणे टाळा. सनस्क्रीन वापरा. पूर्ण बाह्यांचे कपडे, टोपी आणि UV-संरक्षित चष्मा वापरा. तसेच सावलीत राहावे.
- डॉ. रवि व्हनकडे, नेत्ररोग तज्‍ज्ञ, सोलापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news