Solapur Crime : उजनी पाटीजवळ कारमधून छुप्या पद्धतीने दारूची विक्री; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

टेंभुर्णी पोलिसांची धडक कारवाई
Liquor Seizure
टेंभुर्णी पोलिसांनी टाकलेल्या धाडीत जप्त केलेला देशी-विदेशी दारू साठा व संबधीत आरोपी
Published on
Updated on

टेंभुर्णी : पुणे-सोलापूर हायवेवर उजनी पाटीजवळ 'ओमनी' कारच्या माध्यमातून छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीचा टेंभुर्णी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल आत्राम यांच्या पथकाने बुधवारी (दि.५) रात्री ११:१५ च्या सुमारास ही कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी २ लाख ५१ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

आढेगाव शिवारातील सदगुरु हॉटेलसमोर एका मारुती कारमध्ये (क्रमांक MH-42 H-0731) देशी-विदेशी दारूचा साठा असून त्याची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती राहुल आत्राम यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. यावेळी कारमध्ये विठ्ठल वीरा कोळेकर-पाटील हा दारू विकत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी विठ्ठल बिरा कोळेकर-पाटील आणि पिंटू विठ्ठल कोळेकर-पाटील (दोघे रा. आढेगाव, ता. माढा) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारमध्ये देशी- विदेशी दारूच्या बाटल्या असा एकूण १ लाख २१ हजार ५६० रुपये किमतीचा मुद्देमाल व कार असा एकूण २ लाख ५१ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पाटेकर यांनी फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक भीमराव गोळे पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news