Solapur Theft: सोलापुरात दोन चोरीच्या घटनांत ४ लाख ६० हजारांचा ऐवज लंपास

घरातून चार तोळे सोने व रोख रक्कम घेऊन मुलगी फरार; एसटी स्टॅण्डवर प्रवाशाचे दागिने व ५० हजारांवर डल्ला
Jewellery Theft
Jewellery Theft(Pudhari Photo)
Published on
Updated on

सोलापूर : शहरात चोरीच्या दोन स्वतंत्र घटनांमध्ये चोरट्यांसह एका तरुणीने मिळून तब्बल ४ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. वसंत विहार परिसरात मुलीनेच घरातील चार तोळे सोन्याच्या बांगड्या व रोख रक्कम घेऊन पलायन केल्याची घटना घडली. तर सोलापूर एसटी स्टॅण्डवर गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने प्रवाशाच्या बॅगेतील सोन्याचे दागिने व रोख ५० हजार रुपये लंपास केले. दोन्ही घटनांप्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

घरातील चार तोळे सोने व रोख रक्कम घेऊन मुलगी फरार

वसंत विहार येथे घरातील चार तोळे सोन्याच्या बांगड्या आणि रोख रक्कम असा २ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज घेऊन २० वर्षीय मुलगी फरार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी मोहिनी महेश भिंगारे (वय ४३, रा. वसंत विहार, सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, त्यांची मुलगी श्रृती महेश भिंगारे (वय २०) हिने घरातील चार तोळे सोन्याच्या बांगड्या आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज घेतला. हे दागिने मोहिनी यांच्या सासूने दिलेले होते. विशाल सुनिल टोणपे (रा. हनुमान नगर, भवानी पेठ, सोलापूर) याने श्रृतीला चोरी करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. याप्रकरणी श्रृती भिंगारे आणि विशाल टोणपे यांच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसटी स्टॅण्डवर दागिने व ५० हजारांवर डल्ला

दुसऱ्या घटनेत सोलापूर एसटी स्टॅण्डवरील गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने प्रवाशाच्या बॅगेतील तीन तोळे सोन्याचे दागिने आणि ५० हजार रुपये रोख, असा एकूण २ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

ही घटना २५ ऑगस्ट रोजी एसटी स्टॅण्डवरील फलाट क्रमांक तीनवर घडली. याप्रकरणी सुशिला मोतीराम पवार (रा. पाटील तांडा, खुदावाडी, ता. तुळजापूर) यांनी फिर्याद दिली आहे. सुशिला पवार या फलाट क्रमांक तीनवर मुरुडकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या बॅगेतील सोन्याची पाच ग्रॅम वजनाची अंगठी, १० ग्रॅमचे मिनी गंठण, १५ ग्रॅमचे मणीमंगळसूत्र आणि ५० हजार रुपये रोख असा एकूण २ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news