Solapur Crime: तरुणांच्‍या टोळक्‍याकडून दोघांवर कोयत्‍याने वार

११ जणांना अटक; सात रस्‍त्‍यावर बुधवारी मध्यरात्री राडा
Crime News
Crime NewsPudhari Photo
Published on
Updated on

सोलापूर : मागील भांडणातून तरुणांच्‍या टोळक्‍याने दोघांवर कोयत्‍याने हल्‍ला चढविला. ही घटना बुधवारी (दि.२४) मध्यरात्री सात रस्‍ता येथे घडली. या प्रकरणी अथर्व विजयकुमार जवळकोटे (वय २०, रा. सोनामातानगर) याने सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ११ जणांना अटक केली आहे.

अथर्वसह त्याचे मित्र महादेव पडसलगी, शुभम हिंगमिरे हे कारमधून चहा पिण्यासाठी सात रस्‍ता येथे गेले होते. यावेळी रियाज ऊर्फ मॅडी नदाफ, नोमान कुडले व त्‍याचे साथीदार तिथे आले. मागील भांडणाचा राग मनात धरून त्‍यांनी अथर्वच्‍या कारवर कोयत्‍याने हल्‍ला चढवला. गाडीच्‍या काचा फोडल्या. अथर्वला मारहाण केली. रियाज नदाफ, नोमान कुडले व साहिल गायकवाड यांनी कोयत्‍याने वार केले. सोडविण्यास आलेल्या महादेव पडसलगी यालाही लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करीत कोयत्‍याने वार केले. या टोळक्‍याने तिथे दगडफेकही केली. या मारहाणीत अथर्व आणि महादेव हे जखमी झाले. सर्व संशयितांना सदर बझार पोलिसांनी गुरुवारी (दि. २५) केली आहे.

अटक तरुणांची नावे

रियाज ऊर्फ मॅडी राजासाब नदाफ (वय २०, रा. रामलाल चौक), नोमान इफ्‍तेकार कुडले (२५, रा. सदर बझार), साहिल ऊर्फ सोनू सुनील गायकवाड (२१, रा. नई जिंदगी), शोएब अजाज खान (२०, रा. रामलाल चौक), रिहान म.रफिक शेख (२०, रा. विजापूर नाका झोपडपट्टी), सुयश रमेश जाधव (१९, रा. हत्तुरे वस्‍ती), रितेश परशुराम गायकवाड (२३, रा. सेटलमेंट), अरमान सिकंदर शेख (२०, रा.लिमयेवाडी), वैभव देविदास गायकवाड (१८, रा. सेटलमेंट), साहिल बाळराज गायकवाड (२०, रा. सेटलमेंट) आणि सिध्दार्थ दशरथ गायकवाड (२४, रा. सेटलमेंट)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news