Solapur News : दळणवळण असुविधेचा कुंकू उद्योगाला फटका

रोपळे-केम-कंदर रस्ता दुरूस्त करण्याची व्यावसायिकांची मागणी
Solapur News
रोपळे-केम-कंदर रस्ता दुरूस्त करण्याची व्यावसायिकांची मागणी
Published on
Updated on

केम : रोपळे -केम -कंदर मार्गाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून याचा फटका केममधील कुंकू उद्योगाला फटका बसत आहे. हा रस्ता त्वरित करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे

रोपळे -केम -कंदर हा रस्ता टेंभुर्णी अहिल्यानगर कुर्डूवाडी या मार्गाला जोडणारा असल्याने या रस्त्यावर वाहनाची सारखी वर्दळ असते. मात्र ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळेे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. तारेवरची कसरत करावी लागत आहे. कंदर- केम रस्त्याचे अंतर 14 किलोमीटर असले तरी खराब रस्त्यामुळे अंतर पार करण्यासाठी जवळपास पाऊण तासाचा वेळ जातो.

केम हे गाव कुंकू उद्योगासाठी देशात प्रसिद्ध असले तरी येथील दळणवळणाच्या सुविधामुळे याचा कुंकू उद्योगाला फटका बसत आहे. परिणामी आणि कुंकू कारखाने शहराकडे स्थलांतरित होऊ लागले आहेत. आपत्कालीन परिस्थिती गंभीर रुग्णांना अकलूज किंवा इंदापूर येथील रुग्णालयाला नेण्यासाठी या रस्त्याचा मोठा अडथळा निर्माण होत आहे. वेळेत उपचार मिळू न शकल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्याचे नागरिकांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news