Vande Bharat Train : सोलापुरातून स्लीपर वंदेभारतने पुण्यात पोहोचा सकाळी आठ वाजताच...!

मुंबई-बंगळुरू गाडी आजपासून धावणार
Vande Bharat sleeper train
Vande Bharat sleeper trainFile Photo
Published on: 
Updated on: 

सोलापूर : पहिली स्लीपर वंदे भारत एक्स्‍प्रेस आज मुंबई-बंगळुरू दरम्यान रविवारपासून (दि. १) धावणार आहे. ही गाडी सोलापुरात पहाटे चार वाजून वीस मिनिटांनी येईल. या गाडीने पुण्यात सकाळी आठ वाजता तर मुंबईत ११ वाजून ५५ मिनिटांनी पोहोचता येईल.

बंगळुरू स्थानकावर मुंबई-बंगळुरू-मुंबई स्लीपर वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. ही गाडी दि. २ नोव्‍हेंबरपासून नियमित वेळापत्रकानुसार सोमवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावेल. सोलापूर स्टेशनवर ही गाडी पहाटे चार वाजून २० मिनिटांनी येईल. सोलापुरात फक्त पाच मिनिटांचा थांबा घेऊन पुढे जाईल. ही गाडी ११ वाजून ५५ मिनिटांनी मुंबईत पोहोचेल.

बंगळुरूहून दर सोमवारी, तर मुंबईहून दर मंगळवारी ही सेवा बंद असेल. बंगळुरू-मुंबई (गाडी क्र. २७६५२) बंगळुरूहून सायंकाळी सात वाजून ४५ मिनिटांनी निघेल. सोलापूरला पहाटे चार वाजून २० मिनिटांनी वाजता पोहोचेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.