Solapur News: आंतरराष्ट्रीय मैदान उभारणार

विद्यापीठ आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनमध्ये सामंजस्य करार
Solapur News |
सोलापूर : विद्यापीठ व जिल्हा क्रिकेट असो. मध्ये करारप्रसंगी मान्यवर.Pudhari Photo
Published on: 
Updated on: 

सोलापूर : आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान उभारण्यासंदर्भात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्यात करार झाला. दरमान्य, या करारमुळे खेळाडूंना अत्याधुनिक प्रशिक्षण सुविधा व व्यावसायिक मार्गदर्शन मिळणार आहे. शहरासाठीही हे मैदान महत्त्वाचे ठरेल, ज्यामुळे भविष्यात येथे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट सामने आयोजित करता येतील. या ऐतिहासिक निर्णयामुळे सोलापूरच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा मिळेल.

विद्यापीठाच्याराष्ट्रमाता जिजाऊ सभागृहात कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप माने, चेअरमन आ. रणजीतसिंह मोहिते पाटील, संयुक्त सचिव खा. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रीडा संचालक व प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे आणि सहसचिव चंद्रकांत रेम्बरसू यांच्या स्वाक्षर्‍या झाल्या. ावेळी विद्यापीठाचे कायदा अधिकारी ड. जावेद खैरदी, क्रिकेट असोसिएशनचे प्रकाश भुतडा, अ‍ॅड. बसवराज सलगर, मुकुंद जाधव, संतोष बडवे, डॉ. विकास पाटील आदी उपस्थित होते.

क्रीडा क्षेत्रासाठी करार महत्त्वाचा : कुलगुरू

क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना योग्य संधी मिळाव्यात यासाठी विद्यापीठ नेहमीच कटिबद्ध आहे, असे कुलगुरू प्रा. डॉ. महानवर यांनी सांगितले. झालेला हा करार सोलापूरच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा ठरणार आहे. ज्यामुळे खेळाडूंना नवीन संधी मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news