

सोलापूर : सोलापूर-तिरुपती साप्ताहिक विशेष गाडी आता धर्मावरमपर्यंत धावणार आहे. सोलापूरसह परिसरातील प्रवाशांच्या मागणीनुसार सोलापूर विभागीय रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे सोलापूर ते धर्मावरम दरम्यान अतिरिक्त 20 साप्ताहिक विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. याचा भाविकांना लाभ मिळणार आहे.
गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे - सोलापूर-धर्मावरम साप्ताहिक विशेष गाड्या वीस फेर्या होतील. गाडी क्रमांक 01437 साप्ताहिक ही विशेष गाडी गुरूवार रोजी 24 जुलै ते 25 सप्टेंबरपर्यंत दर गुरुवारी रात्री 23:20 वाजता सोलापूरहून निघेल व तिसर्या दिवशी 3:30 वाजता धर्मावरम येथे पोहोचणार आहे. याचे एकूण दहा फेर्या होतील. तर गाडी क्रमांक 01438 ही विशेष साप्ताहिक 26 जुलै ते 27 सप्टेंबरपर्यंत दर शनिवारी धर्मावरम येथून सकाळी 5:30 वाजता निघेल आणि तिसर्या दिवशी सकाळी 10:30 वाजता सोलापूर स्थानकावर पोहोचणार आहे. ही गाडी सोलापूरसह शहर व जिल्ह्यासह तिरूपती-धर्मावरमपर्यंत असलेल्या दोन राज्यातील वीस स्थानकावर थांबणार आहे. यामुळे, येथीलही भाविकांना याचा लाभ होणार आहे. ही गाडी सुरू झाल्यामुळे सोलापूर विभागासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या राज्यातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे. भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
ही गाडी कुर्डूवाडी, बार्शी टाऊन, धाराशिव, लातूर, लातूर रोड, बीदर, कलबुर्गी, वाडी, यादगीर, कृष्णा, रायचूर, मंत्रालयम रोड, अदोनी, गुंटकल, गुत्ती, ताडिपत्री, यरागुंटला, कडप्पा, राजमपेटा, रेणीगुंटा, तिरुपती, पाकाला, पीलेर, मदलपल्ली रोड, मुलकला चेरुव, कदीरी आदी ठिकाणी थांबते.