Solapur motorcycle theft: विविध ठिकाणांवरील तीन दुचाकी लंपास

शहरातील तीन वेगवेगळ्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवार आणि शनिवार अशा दोन दिवसांत वेगवेगळ्या कंपनीच्या तीन दुचाकी चोरल्याची घटना घडली
Solapur motorcycle theft: विविध ठिकाणांवरील तीन दुचाकी लंपास
Pudhari
Published on
Updated on

सोलापूर : शहरातील तीन वेगवेगळ्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवार आणि शनिवार अशा दोन दिवसांत वेगवेगळ्या कंपनीच्या तीन दुचाकी चोरल्याची घटना घडली आहे. या चोरीप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गत बुधवार रोजी हैदराबाद रस्त्यावरील मार्केट यार्ड परिसरातील एका हॉटेलच्या जवळ अरबाज मैनुद्दीन बागवान (रा. चांदलक्ष्मी नगर, शेळगी) यांनी आपल्या मालकीची पन्नास हजार रुपये किमतीची (एमएच 13 बीबी 63 17) दुचाकी पार्क केली होती. ती दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. ही घटना गेल्या बुधवारी चारच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जेलरोड पोलिसात अरबाज बागवान यांनी फिर्याद दिली आहे. तसेच होटगी रोड येथील सूरज नागनाथ सिंग मरोड यांनी रमण नगर येथे आपल्या मालकीची 20 हजार रुपये किमतीची (एमएच 13 बीएफ 0002) ही दुचाकी पार्क केली होती. ही दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली आहे.

या चोरीच्या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात मरोड यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. कुंभारीच्या गोदुताई परुळेकर विडी घरकूल येथील आफताब सिद्दिकी शेख यांनी शहरातील शांतीनगर येथे आपल्या मालकीची 50 हजार रुपये किमतीची (एमएच 13 एडी 4413) पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. ही घटना गत शुक्रवार रोजी सकाळी सातच्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात शेख यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. शहरातील जेलरोड व एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news