Solapur Pomegranate Farming: तीन एकर डाळिंब बागेतून ७२ टनातून उत्पादन

९० रुपये दराने ६० लाखांचे विक्रमी उत्पादन
Solapur Pomegranate Farming
Solapur Pomegranate Farming
Published on: 
Updated on: 

टेंभुर्णी : माढा तालुक्यातील कन्हेरगाव येथील प्रगतिशील शेतकरी विकास दशरथ माने यांनी तीन एकर डाळिंब बागेत यंदा विक्रमी ७२ टन उत्पादन घेतले आहे.त्यांना सरासरी ९० रुपये दराने डाळींबाची विक्री होऊन ६० लाखांचे विक्रमी उत्पादन मिळाले आहे.

विकास माने यांनी त्यांच्या शेतात साधा भगवा या जातीच्या डाळिंबाची लागवड केली होती.तीन एकर बागेत एकूण ९५० डाळिंबाची झाडे आहेत.त्यापैकी ३०० झाडे आठ वर्षांची असून या पिकाचा सातवा हंगाम सुरू आहे. झाडांपासून प्रति झाड सरासरी ६० किलो उत्पादन मिळाले. बागेचे हार्वेस्टिंग ४ सप्टेंबर पासून सुरू झाले. आतापर्यंत ७२ टन डाळिंबाची काढणी झाली आहे. सरासरी ९० रुपये किलो दर मिळाला आहे.

या बागेस कन्हेरगांवचे माजी उपसरपंच धनंजय मोरे,विकास माने,पृथ्वीराज माने,राजेंद्र केदार यांच्यासह परिसरातील गावातील शेतकऱ्यांनी भेट दिली आहे. चांगले उत्पादन तेही दर्जेदार व चांगला दर यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. योग्य नियोजन, वेळच्या वेळी खते, औषधाची मात्रा यामुळे चांगले उत्पादन व आर्थिक नफा मिळवता येतो हे विकास माने यांनी दाखवून दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news