Solapur Theft | चोरट्यांनी मारला डाळिंबाच्या बागेवरच डल्ला, तब्बल 20 लाखांची डाळिंबे लंपास, सोलापूरातील केम येथील चोरीचे पोलिसांपुढे आव्हान

शेतकऱ्यांत खळबळ, जवळपास 10 टन तयार चांगल्या प्रतिची डांळींबे चोरीला, दोन दिवस चोरी होत असल्याचा शेतकऱ्यांना संशय
Solapur Theft | चोरट्यांनी मारला डाळिंबाच्या बागेवरच डल्ला,
Solapur Theft | चोरट्यांनी मारला डाळिंबाच्या बागेवरच डल्ला,
Published on
Updated on

केम : करमाळा तालुक्यातील केम येथे ज्ञानेश्वर गोडसे या शेतकऱ्याच्या डाळिंब बागेवर चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास धाडसी दरोडा टाकून अंदाजे 20 लाख रुपये किमतीची डाळिंब लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तयार झालेला माल रातोरात गायब झाल्याने संबंधित शेतकरी हवालदिल झाला असून पोलीसांपुढे आरोपी शोधण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.सदर प्रकार ३० एप्रिल च्या दरम्यान घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केम येथील प्रगतशील शेतकरी यांनी व्याजाने कर्ज काढून, लाखो रुपये खर्च करून डाळिंब बाग फुलवली होती. बाजारात चांगला भाव मिळेल या आशेने काढणीची तयारी सुरू असतानाच चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत संपूर्ण बागेतील तयार फळे गायब केली. अज्ञात वाहनाने डाळिंब नेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बागेत फिरत असताना शेतकऱ्यांना ही बाब लक्षात आली.

सहाय्यक कृषी अधिकारी, केम वाल्मिक आप्पा चौधरी यांनी स्वतः स्थळपाहणी करून चोरीचा पंचनामा अहवाल' दिला असून ,अहवालानुसार गट नंबर 368/1/ड मधील 0.70 हे. क्षेत्रात 665 डाळिंब झाडे आहेत. प्रती झाड 15 किलो या सरासरीने एकूण 9975 किलो उच्च प्रतीची फळेचोरीला गेली. सध्याचा बाजार भाव 205 रु. किलो धरता चोरीस गेलेल्या मालाची एकूण किंमत 20,44,875 रु.एवढी होते. अहवालात नमूद क

या बाबत बोलताना शेतकरी ज्ञानेश्वर म्हणाले की माझी पावणेदोन एकर बाग असून साडेसहाशे फुट लांबीचा पट्टा आहे. मी एकटाच झोपायला असतो खालच्या बाजूने माल काढलेला लक्षात आले नाही. दोन दिवस त्यांनी माल चोरला असावा.

शेतकरी ज्ञानेश्वर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news