Solapur Theft News : मोटारसायकल चोरणार्‍या तिघांना पकडले

मोटारसायकल चोरीचे सहा गुन्हे उघडकीस
Solapur Theft News |
सोलापूर : जप्त केलेल्या मोटारसायकलींसोबत शहर गुन्हे शाखेचे पथक.Pudhari Photo
Published on
Updated on

सोलापूर : शहर गुन्हे शाखेने मोटारसायकल चोरणार्‍या तिघांना शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली. त्यांच्याकडून मोटारसायकलीचे सहा गुन्हे उघडकीस आले असून, मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

पसारे वस्ती रस्त्यावर चोरीची मोटारसायकल घेऊन थांबलेल्या सैफन नरूद्दीन बागवान (वय 30, रा. किसान नगर, सोलापूर) याला अटक केली. त्याच्याकडून तीन मोटारसायकली जप्त केल्या. सोलापूर मार्केट यार्ड, मंगळवेढा येथून या मोटारसायकली चोरल्या होत्या. अक्कलकोट रोडवरील किसान नगर जवळ गणेश ज्ञानबा कांबळे (वय 30, रा. तुळजाभवानी नगर, जुना विडी घरकुल, सोलापूर) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीच्या दोन मोटारसायकली ताब्यात घेण्यात आल्या.

विडी घरकूल आणि सीएनएस हॉस्पिटल येथून या मोटारसायकली चोरल्या होत्या. याबरोबर एक इसम चोरीची मोटारसायकल घेऊन, नेताजी सुभाष चंद्र बोस बगीच्या समोरील सार्वजनिक रस्त्याचे ठिकाणी येणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्यानुसार तेथून गणेश मल्लीनाथ स्वामी (वय 20, रा. सर्वोदय नगर मुळेगांव रोड, सोलापूर) त्याच्याकडून मिल्लत मशीद येथून चोरी केलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली. तीन चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून सहा गुन्ह्यातील एक लाख 55 हजार रुपयांच्या सहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news