Solapur Theft News: कुटुंब लग्नासाठी गेले अन्‌‍ साडेचौदा लाखांची घरफोडी

अंत्रोळीकर नगरातील एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 14 लाख 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले
Theft
TheftPudhari
Published on
Updated on

सोलापूर : शहरातील उच्चभू्र समजल्या जाणाऱ्या अंत्रोळीकर नगरातील एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 14 लाख 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. 25 जानेवारी ते 4 फेब्रुवारीदरम्यान हा प्रकार घडला.

रवी प्रकाश दौलताबाद (रा. अंत्रोळीकर नगर भाग 3, होटगी रोड, सोलापूर) हे नातेवाईकांच्या लग्नाच्या निमित्ताने कुटुंबासह 25 जानेवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान बाहेरगावी गेले होते. पाच फेब्रुवारी रोजी ते सोलापुरात परत आले. त्यावेळी चोरट्याने घराचे कुलूप, कडी, कोयंडा तोडून घरातील सोन्याचे दागिने लंपास केल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी सहा तोळे सोन्याचे गंठण, सात तोळे सोन्याचे गंठण, तीन तोळे सोन्याच्या पाटल्या, अडीच तोळे सोन्याच्या बांगड्या असा एकूण 14 लाख 40 हजारांचा मुद्देमाल लांबवला. विजापूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक गायकवाड करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news