

बार्शी : बार्शी शहर पोलिस ठाणे गुन्हे प्रकटीककरण शाखेने घरफोडीचा गुन्हा उघड करून दोघांकडून तीन लाख 97 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळविले. भाडेकरूनेच मित्राच्या मदतीने चोरी केल्याचे समोर आले आहे.
सूरज बाळासाहेब झरकर (वय 32 वर्षे रा. हांडे गल्ली बार्शी) व भाडेकरू माधव सोनाजी कुलकर्णी (21, रा. हांडे गल्ली, बार्शी) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. दुर्गा नारायण पौळ (रा. धनगर गल्ली बार्शी) यांनी याबाबत बार्शी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्या नातेवाईकांच्या विवाहाच्या धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने घराला कुलूप लावून चावी त्यांच्या आईकडे देऊन गेल्या होत्या. त्यावेळी बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने तीन लाख 97 हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले होते.
पोलिस तपासात फिर्यादी दुर्गा पौळ यांच्या घरामध्ये भाड्याने असणारे सूरज बाळासाहेब झरकर व त्याचा साथीदार मित्र माधव सोनाजी कुलकर्णी यांनी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. दोघांना अटक करण्यात आली.
उपविभागीय पोलिस अधिकारी जालींदर नालकुल, पो. नि. बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, सपोफौ अजित वरपे यांच्यासह इतर कर्मचार्यांनी कामगीरी पार पाडली.