Solapur temperature: सहा दिवसांपासून तापमान 39 अंशावर स्थिर

सोलापुरात उकाडा कायम, ऊन-ढगाळ हवामानाचा रंगला खेळ
temperature
temperaturePudhari
Published on
Updated on

सोलापूर : यंदाचा मार्च महिना सर्वाधिक उष्णतेचा ठरला असून, मागील सहा दिवसांपासून तापमान 39 अंशावर स्थिर असूनही उकाडा कायम आहे. ऊन-ढगाळ हवामानाचा खेळ सोमवारी दिवसभर रंगला. त्यामुळे वातावरणात बदल अनुभवयला आला तरी उष्णतेच्या झळा मात्र कायम वाहत होत्या.

27 मार्च रोजी 40.4 अंश सेल्सिअस इतका सर्वेाच्च तापमानाची नोंद ठरली होती. त्यानंतर 25 ते 30 मार्च या कालावधीत तापमान 39 अंशावर स्थिर राहिला आहे. 28 मार्च रोजी 39 अंश तर 26 मार्च 39.4 अंश, 27 मार्च रोजी 40.4 अंश, 28 मार्च रोजी 39.5 अंश, 29 मार्च रोजी 39.2 अंश, 30 मार्च रोजी 39.7 अंश सेल्सिअस इतका तापमान नोंदला गेला आहे.

भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये दि. 30 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविली आहे. कमाल तापमान 37.0 अंश सेल्सिअस ते 39.0 अंश सेल्सिअस पर्यंत तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस ते 25 अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे.

सकाळची सापेक्ष आद्रता 44 ते 50 टक्के तर दुपारची सापेक्ष आद्रता 28 ते 33 टक्के दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 6.0 ते 16.0 किमीपर्यंत राहण्याची शक्यता वर्तविली आहे. वादळी वाऱ्याससह गारपीट, मेघगर्जना, विजांसह पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यात दि. 1 व 2 एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांसह मध्यम पावसाची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news