

सोलापूर : सोलापूर शहरात मंगळवारी तापमानाने 43.4 अंशांचा उच्चांक गाठला. ते यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान आहे. सूर्यनारायणाच्या प्रखर उष्णतेमुळे शहरवासीयांना ‘शोलापूर’चा अनुभव आला आहे. सकाळी आठ ते रात्रीपर्यंत कडक उन्हाच्या धगीचा मारा सहन करावा लागला. सूर्यास्तानंतरही उष्णता कायम राहिली. यामुळे शहरातील नागरिक हैराण झाले होते. कडक उन्हामुळे चौकाचौकांतील वर्दळ कमी झाली होती. तसेच रस्ते ओस पडले होते. बाजारपेठेत तुरळक गर्दी दिसत होती. दुपारी 12 नंतर शहरात कर्फ्यूसद़ृश परिस्थिती निर्माण झाली होती.
आठवड्यापासूनचे वाढते तापमान
16 एप्रिल 42.2
17 एप्रिल 42.8
18 एप्रिल 43.2
19 एप्रिल 42.8
20 एप्रिल 43.0
21 एप्रिल 43.0
22 एप्रिल 43.4