Solapur News| सोलापुरात उन्हाचे चटके वाढले; ३७.४ अंश तापमानाची नोंद

उन्हाच्या तीव्रतेमुळे रस्त्यांवर वर्दळ कमी
Weather Update
सांगली : जिल्हा उद्यापासून होरपळणार www.pudharinews.
Published on: 
Updated on: 

सोलापूर : पावसाळा संपताच सोलापूर जिल्ह्यात उन्हाचा तडाखा पुन्हा वाढू लागला असून, ऑक्टोबर हिटचा चटका जाणवू लागला आहे. शहराच्या तापमानात वाढ होत असून सोमवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी कमाल तापमान ३७.४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे.

ऑक्टोबरच्या सुरुवातीला पावसाऐवजी उन्हाची तीव्रता वाढल्याने वातावरणात उकाडा निर्माण झाला आहे. राज्यातील अनेक भागांत कमाल तापमानात वाढ होत असल्याचे हवामानविषयक अहवालांतूनही दिसून येत आहे. सोलापुरात पुढील काही दिवसही कमाल तापमान ३४ ते ३५ अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत असून दुपारी रस्त्यांवर वर्दळ कमी होत आहे.

यंदा सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली असताना ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच तापमान वाढल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. खरीप पिकांचे नुकसान झाल्यानंतर रब्बी हंगामासाठी जमिनीतील ओलावा आणि पाण्याची उपलब्धता महत्त्वाची आहे. मात्र, वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढून उपलब्ध पाण्यावरही ताण येण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news