

सोलापूर : शहर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात घट होत असून थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे. हवेत निर्माण झालेल्या गारठ्यामुळे सोलापूरकरांना थंडीची हुडहुडी लागली आहे. रविवारी शहरात 17.5 अंश सेल्सिअस इतका किमान तापमान नोंदला गेला.
गेल्या तीन दिवसांपूर्वी किमान तापमानात वाढ झाली होती. थंडीत काहीशी घट झाली होती. आता पुन्हा थंडी वाढ होत आहे. दुपारी कडक उन्ह तर पहाटे, सायंकाळी आणि रात्री कडक थंडी अशी परिस्थिती ओढत आहे.
पुढील पाच दिवस किमान तापमानात घट होऊन थंडी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 8 डिसेंबर रोजी किमान तापमान 17.4, कमाल तापमान 30.2 अंश सेल्सिअस तर 9 डिसेंबर रोजी किमान तापमान 16, कमाल तापमान 30.7, 10 डिसेंबर रोजी किमान तापमान 15.1, कमाल तापमान 31, 11 डिसेंबर रोजी किमान तापमान 14.7, कमाल तापमान 30.6, 12 डिसेंबर रोजी किमान तापमान 14.1, कमाल तापमान 30.1 अंश सेल्सिअस इतके तापमान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे.