Solapur temperature: तापमानात दीड अंशानी घट

धग कायम; तप्त झळांनी सोलापूरकर त्रस्त
 Temperature
TemperaturePudhari
Published on
Updated on

सोलापूर : एप्रिल पाठोपाठ मे महिन्यातही सूर्यनारायण आग ओकत असून, तप्त झळामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सोमवारी कमाल तापमानात 1.4 अंशानी घट होऊनही उन्हाच्या तप्त झळा वाहत असल्याने दुपारच्या वेळी रस्त्यावरील जनजीवन विस्कळीत झाले होते.

गतवर्षी पाऊसमान चांगला झाल्याने थंडी मोठ्याप्रमाणात सुटली होती. उन्हाळाही त्रासदायक नसतील असा अंदाज होता. परंतु, अंदाज चुकवत एप्रिल पाठोपाठ मे महिनाही तापदायक ठरत आहे. सोमवारी 40.8 अंश सेल्सिअस, तर रविवार, दि. 3 मे रोजी 42.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते. येत्या पावसाळ्यावर एल निनोचा सावट असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मे महिन्याचा पहिला आठवडा संपत आला आहे. अजूनही उष्णतेच्या झळात दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुढील आठवड्यात सोलापूरचे तापमान 44 अंशांवर जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

वाढत्या तापमानामुळे शरीरावर दुष्परिणाम होऊन उष्माघाताला बळी पडू नये, यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी. सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत थेट उन्हात फिरणे टाळावेत, ताक, लिंबू सरबत, सब्जी, कलिंगड, नारळ पाणीसारख्या नैसर्गिक पेयांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासन व आरोग्य विभागाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news