

सोलापूर : यंदाच्या उन्हाळ्यात सूर्यनारायणाचा प्रकोप मोठ्या प्रमाणात दिसत आहे. जिल्ह्यात रविवार, दि. 17 मे रोजी उच्चांकी 44 अंश से. इतकी उच्चांकी तापमानाची नोंद झाली.
यंदाच्या मोसमातील हा सर्वात उष्ण दिवस ठरला. तप्त झळांमुळे सोलापूरच्या शहरातील रहदारीचे रस्ते, चौक जवळपास निर्मनुष्य झाले होते. यापूर्वी 5 मे 2024 रोजी 44.4 अंश इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. यंदाही उच्च तापमान राहण्याचा अंदाज आहे.
सोलापूरच्या तापमानात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत असून मागील 37 दिवसांपासून तापमान 40 अंश सेल्सिअसहून अधिकच आहे. 27 एप्रिल रोजी 43.9 अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. त्यानंतर तापमानाचा पारा हा 40 अंशावरच राहिला. शनिवारी 43.3 इतके तापमान राहिले. संपूर्ण मे महिन्यात असेच तापमान राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.