Solapur News : एप्रिलमध्ये तिसऱ्यांदा पारा 43 अंश पार

उष्णतेच्या तीव्र झळांमुळे नागरिक त्रस्त
Solapur News
एप्रिलमध्ये तिसऱ्यांदा पारा 43 अंश पार
Published on
Updated on

सोलापूर : यंदाचा एप्रिल महिना हा सर्वाधिक उष्णतेचा महिना ठरला असून रविवारी तिसऱ्यांदा तापमानाचा पारा 43 अंशानी पार केला आहे. त्यामुळे उष्णतेची लाट निर्माण झाली असून, नागरिक प्रचंड घामाघूम झाले. उष्णतेच्या तीव्र झळांमुळे लहान मुले, वयोवृद्ध आणि आजारी माणसांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

यापूर्वी 15 एप्रिल रोजी 43.3 अंश तर 16 एप्रिल रोजी 43.4 अंश सेल्सिअस सर्वेाच्च तापमानाची नोंद झाली होती. पुन्हा 26 एप्रिल रोजी तिसऱ्यांदा 43 अंश नोंदवले गेले. रविवारी (दि. 26) विवाह मुहूर्त होते, त्यामुळे शहरासह ग्रामीण भागामध्ये विवाह समारंभाची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने लग्न मंडपातही तीव्र उष्णतेच्या लाटेला सामोरे जावे लागले. मागील 20 दिवसांपासून सोलापूरच्या तापमानात सातत्याने वाढ होत असून यामुळे उष्णतेच्या झळा वाहत आहेत. नागरिक त्रस्त झाले असून जनजीवनांवर परिणाम झाला आहे. गत 10 एप्रिलपासून सोलापूरचे तापमान 40 अंशावर राहिले आहे. सकाळपासूनच प्रचंड उकाड्याने नागरिकांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत.

एप्रिल तापदायक

14 एप्रिल 43.2

15 एप्रिल 43.3

16 एप्रिल 43.4

17 एप्रिल 42.2

18 एप्रिल 42.2

18 एप्रिल 42.4

19 एप्रिल 42.9

20 एप्रिल 40.0

21 एप्रिल 42.7

22 एप्रिल 40.0

23 एप्रिल 42.0

24 एप्रिल 41.0

25 एप्रिल 42.0

26 एप्रिल 43.0

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news