

करमाळा : जिंती मंडळातील महत्त्वाचा रस्ता तहसीलदारांच्या कौशल्याने खुला करण्यात आला असून दोन गटातील वाद सामपचाराने मिटवण्यात यश आले आहे.या रस्त्याचे तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
मौजे कोंढारचिंचोली येथील विठ्ठल लक्ष्मण गलांडे व इतर विरूद्ध बबन आंबादास गलांडे व इतर यांच्यात रस्त्यावरुन वर्षानुवर्षे वाद होता. त्यामुळे या दोन्ही गटाच्या लोकांना सतत या रस्त्यासाठी वाद खेळावा लागत होता मात्र हा रस्ता तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या मध्यस्थीने हा वाद समपचाराने मिटवण्यात आला. सामंजस्याने वाद मिटवून खुला करून हा रस्ता तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
सदर रस्त्यामुळे 23 शेतकरी खातेदार यांची 16 हेक्टर जमीनींचा रस्त्याचा प्रश्न मिटणार आहे. याकामी सहकार्य करणार्या शेतकर्यांचा सन्मान तहसीलदार ठोकडे यांचा हस्ते करण्यात आला. महसुल कर्मचारी व अधिकार्यांचेे कौतुक केले जात आहे.
तीन रस्ते खुले
जिंती मंडळातील तीन कठीण रस्ते सामंजस्यातून खुले करण्यात आले आहेत.कावळवाडी या अत्यंत दुर्गम व तालुक्याच्या टोकाच्या गावामध्ये शासकीय कार्यक्रम प्रथमच घेण्यात आला. यामुळे सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे.