Solapur Accident : बहिणीला भेटून जाताना तडवळेतील एकाचा शेटफळजवळ अपघाती मृत्यू

भांगे वांगे वस्ती जवळील घटना
Accident
AccidentPudhari
Published on: 
Updated on: 

मोहोळ : बहिणीला भेटून दुचाकीवरून परत गावाकडे निघालेल्या भावाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ८:३० च्या सुमारास शेटफळ गावच्या हद्दीत माढा रस्त्यावरील भांगे वांगे वस्ती जवळ घडली.

शहाजी अर्जुन पौळ (वय ४८, रा. तडवळे ता. बार्शी) असे अपघातातील मृताचे नाव आहे. येथील शहाजी पौळ हे बहिणीला भेटायला मोहोळ तालुक्यातील सिद्धेवाडी येथे दुचाकीवरुन आले होते. बहिणीची भेट घेऊन परत सिद्धेवाडी येथून दुचाकीवरून शेटफळ ते माढा रस्त्याने सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास निघाले होते. त्यादरम्यान भांगे वांगे वस्ती जवळ त्यांच्या लुना दुचाकीला अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने ते रोडवर पडुन त्यांच्या डोक्याला, चेह-यावर मार लागुन गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मोहोळ येथे आणले असता तेथील डॉक्टरांनी ते उपचारापुर्वीच मयत झाल्याचे सांगितले. महादेव पांडुरंग केसरे (रा.इर्लेवाडी ता. बार्शी) यांनी या अपघाता प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल ज्ञानेश्वर चव्हाण करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news