Solapur Explosion News: गाडीत गंधक ठेवताना स्फोट

सहारा गन हाऊसच्या मालकावर गुन्हा
Solapur Explosion News: गाडीत गंधक ठेवताना स्फोट
Published on
Updated on

सोलापूर : चारचाकी गाडीच्या डिग्गीत छऱ्याच्या बंदुकीसाठी लागणारे गंधक ठेवताना स्फोट झाल्याने एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना शहरातील पापय्या तालीम समोर घडली. याबाबत सहारा गन हाऊसचे मालक बाळासाहेब प्रभाकर फुले याच्यावर फौजदार चावडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केदारनाथ सिध्दप्पा छत्रे (वय 53, रा. रामलिंग नगर, विजापूर रोड, सोलापूर) हा सोमवारी (दि. 11) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चारचाकी स्विफ्ट डिझायर गाडी पापप्या तालमीसमोर थांबवून डिग्गीत काहीतरी ठेवत होता. यावेळी अचानक गाडीत स्फोट झाला. या स्फोटाने आजूबाजूला खळबळ उडाली. अनेकजण भीतीने पळू लागले. स्फोट इतका भीषण होता की, केदारनाथ यांच्या उजव्या पायाच्या ठिकऱ्या उडाल्या. अंगावरील कपडे फाटले. तशाच अवस्थेत ते रस्त्याच्या कडेला पडून होते.

सामाजिक कार्यकर्ते राज सलगर यांनी त्यांना चारचाकी गाडीत घालून शासकीय रुग्णालयात दाखल केले. छऱ्याच्या बंदुकीत भरण्यासाठीचे गंधक घेऊन जाताना त्याचा स्फोट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. छत्रे हा सहारा गन हाऊस येथे कामाला होता. त्यांच्ोच गंधक गाडीतून उतरून ठेवताना हा स्फोट झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे सहारा गन हाऊसचे मालक बाळासाहेब प्रभाकर फुले याच्या विरोधात फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news