Solapur News : साखरपेठेत मावा तयार करण्याच्या साहित्यावर कारवाई

मनपा आयुक्तांच्या आदेशानंतर पथकाने केली मोहीम फत्ते
Solapur News : साखरपेठेत मावा तयार करण्याच्या साहित्यावर कारवाई
Published on: 
Updated on: 

सोलापूर : महापालिका जागेवर अनधिकृतपणे ताबा घेऊन नवीन सायकल बनविण्यासह मावा तयार करण्याचे काम सुरू असल्याचे आयुक्तांच्या पाहणीत निदर्शनास आल्यानंतर साखरपेठ येथील महापालिकेच्या कै. यशोदाबाई सिद्रामप्पा दिड्डी आरोग्य केंद्राच्या मागील बाजूस असलेले समाजमंदिर आणि खुली जागा सील करण्याची कारवाई महापालिका पथकाने पूर्ण केली. भूमी - मालमत्ता विभाग आणि अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने ही संयुक्त कारवाई केली.

यासंदर्भात महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी आरोग्य केंद्राच्या दुरुस्ती कामाची पाहणी केली होती. यावेळी आरोग्य केंद्राच्या मागील बाजूस असलेल्या खुल्या जागेत आणि समाजमंदिराच्या इमारतीत ताबा घेऊन काम सुरू होते.

‘या’ पथकाने केली कारवाई

महापालिका भूमी व मालमत्ता विभागाचे कार्यालय अधीक्षक प्रशांत जाधव, अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे कनिष्ठ अभियंता गणेश काकडे, कनिष्ठ अभियंता स्वप्निल पवार, भूमी व मालमत्ता विभागातील कर्मचारी रघुनाथ सुरवसे आणि रखवालदार अर्जुन चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news