Solapur Farmers Protest : प्रतिटन ५ हजार दर दिल्याशिवाय ऊस देऊ नका

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नांदणी येथे रास्ता रोको
Solapur Farmers Protest : प्रतिटन ५ हजार दर दिल्याशिवाय ऊस देऊ नका
Published on: 
Updated on: 

दक्षिण सोलापूर : शेतकऱ्यांच्या उसाला प्रतिटन ५ हजार रुपये दर मिळावा, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी नांदणी येथे सोलापूर-विजापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी ‘उसाला ५ हजार रुपये दर दिलाच पाहिजे’ अशा जोरदार घोषणा देत शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले.

या आंदोलनात दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. उसाला प्रतिटन ५ हजार रुपये दर मिळाल्याशिवाय साखर कारखान्यांना ऊस देऊ नका, आपल्या हक्काच्या दरासाठी शेतकऱ्यांनी एकजुटीने लढा द्यावा, असे आवाहन केले.

या आंदोलनावेळी अख्तरताज पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील, चिदानंद पाटील, श्रीशैल पाटील, मल्लाप्पा पाटील, मल्लिकार्जुन नरोणी, बिळेणी सुंटे, विजय कुलकर्णी, विजय हजारे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंद्रुप पोलिस ठाण्याचे प्रशिक्षणार्थी डीवायएसपी गणेश शिंदे यांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. यावेळी ऊस दराच्या प्रश्नावर शेतकऱ्यांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलनातून आपली मागणी ठामपणे मांडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news