Heart Disease Diagnosis : 'स्टेमी' प्रकल्पातून हृदयविकाराचे अचूक व जलद पद्धतीने निदान

हायटेक तंत्रज्ञान : २१ महिन्यांत २ लाखाहून अधिक ईसीजी चाचण्या व उपचार मोफत
Heart Disease In India
Heart Disease In India Canva
Published on: 
Updated on: 
गणेश गोडसे

बार्शी : सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आता हृदयविकाराचे निदान अत्यंत अचूक व जलद पद्धतीने केले जात आहे. 'स्टेमी महाराष्ट्र' प्रकल्पांतर्गत जानेवारी २०२५ ते सप्टेंबर २०२६ या २१ महिन्यांच्या कालावधीत हृदयविकाराची लक्षणे जाणवणाऱ्या तब्बल २ लाख १० हजार ८१४ रुग्णांच्या ईसीजी तपासण्या करण्यात आल्या. राज्य सरकारच्या या हायटेक तंत्रज्ञानाचा थेट फायदा ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना होत असून, जीवघेण्या 'मायोकार्डियल इन्फ्राक्शन'चे वेळेत निदान शक्य होत आहे.

स्टेमी म्हणजे 'एसटी एलिव्हेशन मायोकार्डियल इन्फ्राक्शन' हा हृदयविकाराचा अत्यंत गंभीर प्रकार आहे. यामध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या कोरोनरी धमनीत ब्लॉकेज होते. ईसीजीमधील एसटी सेगमेंट एलिव्हेटेड दिसतो. अशी परिस्थिती आल्यास काही मिनिटांत हृदयाचे स्नायू कायमचे निकामी होण्याचा धोका असतो. वेळेत निदान व उपचार न झाल्यास रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ईसीजी मशीन बसवण्यात आली आहे. स्थानिक आरोग्यसेवक रुग्णाचे ईसीजी काढून ते तत्काळ ऑनलाईन पाठवतात. 'कार्डिओनेट' ॲपद्वारे तज्ज्ञ हृदयरोग डॉक्टर हे रिपोर्ट पाहतात. त्वरित उपचार मिळतात. एसटी एलिव्हेशन आढळले, तर तत्काळ 'स्टेमी अलर्ट' तयार होतो. त्यामुळे डॉक्टर त्वरित निर्णय घेऊन रुग्णाला कॅथ लॅबला पाठवतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.