Solapur ST News: एसटी प्रवाशांचे चक्क 'सॅल्यूट' ने स्वागत

चालक-वाहक करून देतात स्वतःची अन्‌ आगाराची ओळख
Solapur ST News: एसटी प्रवाशांचे चक्क 'सॅल्यूट' ने स्वागत
Published on
Updated on

सोलापूर : एक जूनपासून परिवहन महामंडळाच्या एसटी बसच्या चालक व वाहकांकडून प्रवाशांना सॅल्‍यूट करत स्वतःची ओळख करून त्यांचे जय महाराष्ट्र असे म्हणून बसमध्ये स्वागत करण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांना आपण प्रवास करत असलेल्या बसचे चालक व वाहक कोण आहेत. हेही कळू लागले आहेत. यावरून प्रवाशांना बसमध्ये महामंडळाकडून सन्मानाची वागणूक मिळताना दिसू लागली आहे.

परिवहन महामंड‍ळ प्रवाशांचा ओढा महामंडळाच्या बसकडे वाढावा, यासाठी अनेक शक्कल लढवू लागले आहे. चालक व वाहक एक जूनपासून बसमधील प्रवाशांचे तिकीट काढण्यापूर्वी त्यांना सॅल्यूट करत आहेत. वाहक व चालकांकडून स्वतःच्या नावासह ज्या आगारात आपण काम करत आहोत, त्या आगाराचची माहिती देत आहेत.त्यामुळे बसमधील प्रवाशांना आपण प्रवास करत असलेल्या बसचे वाहक व चालकांचे नाव कळत आहे.

एसटीच्या इतिहासात पहिल्यांदाच वाहक-चालक हे प्रवाशांना सॅल्यूट मारून त्यांचे स्वागत करताना दिसत आहे. चालक-वाहकांकडून सॅल्यूटने केले जाणारे स्वागत प्रवाशांना आश्चर्यकारक वाटत आहे. चालक व वाहक स्वतःची ओळख आणि आगाराचे नाव सांगत असल्याने प्रवाशांना एक प्रकारचा सुखद धक्का वाटत आहे.

प्रवाशांना सन्मान देण्यासाठी महामंडळाने घेतलेल्या या निर्णयाचे येथील मध्यवर्ती बसस्थानकातील वाहक व चालकांकडून अंमलबजावणी सुरू झाली आहे. यामुळे सर्वच प्रवाशांमधून समाधानाची भावना व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news