Solapur ST Bus Service : दिवाळीमुळे एसटी मालामाल

दररोज होते ६८१ फेऱ्यांचे नियोजन; २९.४० लाख किलोमीटर धावल्या बस
ST Bus
ST Buspudhari photo
Published on: 
Updated on: 

सोलापूर : दिवाळी सणाच्या काळात वाढलेल्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत येथील परिवहन महामंडळाच्या विभागाने विक्रमी वाहतूक करत ११ दिवसांत १७ कोटी ७७ लाख ६१ हजार रुपये कमावले. दि. ५ ते १५ नोव्हेंबर या ११ दिवसांच्या कालावधीत दररोज एसट्यांच्या सरासरी ६८१ फेऱ्यांचे नियोजन करून त्या चालविल्या. या काळात एसटी बसेसच्या २९ लाख ४० हजार किलोमीटरचा प्रवास झाला.

यातून विना सवलतीचे ११ कोटी ८ लाख ४५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले, तर सवलतींसह एकूण कमाई ही १७ कोटी ७७ लाख ६१ हजार रुपयांवर पोहोचला. दिवाळी सणाच्या काळात गर्दीचे नियोजन करण्यासाठी या विभागातील सर्व आगार व्यवस्थापक व पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांनी वाहतुकीचे नियोजन केले. चालक, वाहक, यांत्रिक तसेच अन्य प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक कामांना प्राधान्य न देता प्रवासी वाहतुकीसाठी सेवा बजावली. त्यांच्या नियोजनबद्ध आणि मेहनतीमुळेच ही विक्रमी कामगिरी शक्य झाली.

११ दिवसांत एसटी बसेसच्या फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले. मार्ग ठरवतांना प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली होती. विक्रमी उत्पन्न मिळवण्यासाठी महामंडळाचे प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी सेवेला प्राधान्य दिल्यानेच हे शक्य झाले.
- अमोल गोंजारी, विभागीय व्यवस्थापक, परिवहन महामंडळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.