MSRTC News : नवरात्रौत्सवात एसटीला १५ दिवसांत १.२८ कोटीचे उत्पन्‍न

१२ लाख ६७ हजार प्रवाशांचा प्रवास; ५९१ बसेसचा वापर
MSRTC News
MSRTC News
Published on: 
Updated on: 

सोलापूर : नवरात्रौत्सवाच्या कालावधीत तुळजापूरच्या यात्रेसाठी परिवहन महामंडळाने विभागातर्फे भाविक प्रवाशांसाठी ५९१ विशेष बसेसचे नियोजन करण्यात आले होते. दि. ११ ते २६ ऑक्टोबर या काळात महामंडळाच्या तिजोरीत १ कोटी २८ लाख ९७ हजार ५१४ रुपयांचा महसूल जमा झाला आहे. यासाठी बसेसच्या ३ हजार ५८ फेऱ्या झाल्या.

एकूण २ लाख २० हजार ७२६ किलोमीटरच्‍या अंतरातून तब्बल १२ लाख ६७ हजार ६ प्रवाशांनी महामंडळाच्या बसेसने प्रवास केला. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा या विभागाच्या उत्पन्‍नात वाढ झाली आहे. या काळात प्रवाशांनी महामंडळाच्या बसेसनेच अधिकतर प्रवास केल्याचे दिसून आले. महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करताना अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिक योजना, दिव्यांग नागरिक योजना यासह विविध योजनांचा लाभही यादरम्यान प्रवाशांनी घेतला.

भाविक प्रवाशांना प्रवासादरम्यान कोणतीही अडचण येऊ यासाठी महामंडळाच्या विभागीय प्रशासनाकडून तयारी केली होती. यामुळे बसेसच्या मोठ्या प्रमाणात फेऱ्या झाल्या आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा उत्पन्‍नात वाढ झाली असल्याचे विभागीय व्यवस्थापक अमोल गोंजारी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news