Solapur News : सर्वच एसटी बसेस इलेक्ट्रिक

येत्या दहा वर्षांत परिवहन कात टाकणार
Solapur News
इलेक्ट्रिक एसटी बसेस Saamana
Published on
Updated on

सोलापूर : परिवहन महामंडळाकडून राज्यातील सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणण्याचा निर्णय घेण्यात असून 2035 पर्यंत महामंडळाच्या ताफ्यातील सर्वच्या सर्व 15 हजार बसेस पूर्णपणे इलेक्ट्रिक असणार आहेत. त्यादृष्टीने महामंडळाच्या उच्च स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत.

राज्यातील वाढत्या प्रदूषणाला रोखण्यासाठी व वातावरणात होत असलेल्या बदलाला ब्रेक लावण्यासाठी महामंडळाकडूनही एक पाऊल पुढे टाकले जात आहे. तसेच इंधनाच्या दरातील अस्थिरतेचा विचार करून ग्रामीण भागातील जनतेच्या जीवनवाहिनीला हरित ऊर्जेची जोड देणे काळाची गरज बनली आहे. या इलेक्ट्रिक बसेसमुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर रक्षण होईल. तसेच इंधनासह देखभालीच्या खर्चातही बचत होऊन महामंडळाची आर्थिक स्थितीही सुधारणार आहे.

इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करणाऱ्यांना विशेष कर सवलती व पथकर (टोल ) माफी दिली जात आहे. राज्य व राष्ट्रीय महामार्गावर प्रति किलोमीटरवर अंतरावर चार्जिंग स्टेशन्स उभारले जातील. सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व चार्जिंग स्टेशन्स सौर ऊर्जेवर चालवण्याचा विचारही शासनाच्या विचाराधीन आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news