Solapur unseasonal rain: दक्षिण तालुक्याला अवकाळीने झोडपले

विंचूर येथे नारळाच्या झाडावर पडली वीज; पिकांचे मोठे नुकसान
Solapur unseasonal rain: दक्षिण तालुक्याला अवकाळीने झोडपले
Published on
Updated on

दक्षिण सोलापूर : सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये वादळी वारा विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. विंचूर येथे नारळाच्या झाडावर वीज पडली.

विंचूर, शंकर नगर, मंद्रुप आहेरवाडी, सिंदखेड, राजुर, औराद, बिरनाळ, हत्तुर, होनमुर्गी, वडकबाळ, तेरा मेल, कारकल, माळकवठे, होटगी परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. याच दरम्यान, विंचूर शिवारातील गुरव वस्ती भागात असलेल्या एका उंच नारळाच्या झाडावर अचानक वीज पडली. वीज कोसळताच मोठा आवाज झाला, ज्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले.

वीज पडल्याने नारळाच्या झाडाला आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. वस्तीवरील नागरिक सुरक्षित स्थळी असल्याने मोठा अनर्थ टळला. दक्षिण तालुक्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पिकाचे नुकसान झाले आहे. यामध्ये गहू ज्वारी द्राक्ष आंबा पिकांचा समावेश आहे. वादळी वाऱ्यामुळे कैऱ्या मोठ्या प्रमाणात गळून पडल्या आहेत तर काही ठिकाणी द्राक्ष बागायतदारांनी बेदाणा शेडवर वाळत घातलेले बेदाणे ताडपत्री उडून गेल्यामुळे पावसानेे भिजले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्याची मोठी आर्थिक हानी झाली.

वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर उकाडा जाणवत होता मात्र संध्याकाळी साडेआठच्या सुमारास वादळीवारासह पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news