Solapur Crime: लग्न लावून देईना म्हणून पोराने केला बापाचा खून

वाकी शिवणेतील घटना; कर्ज, शेती विकण्याचेही कारण
Solapur Crime
Solapur CrimePudhari
Published on
Updated on

महूद : वडिलांनी काढलेली कर्जे, ती फेडण्यासाठी शेत जमीन विकण्याचा घातलेला घाट, त्यातच आपले लग्न लावून देईना म्हणून वैतागलेल्या 32 वर्षीय मुलाने वडिलांचा डोक्यात लोखंडी पाईप मारून खून केला. ही घटना सांगोला तालुक्यातील वाकी-शिवणे येथे सोमवारी (ता. 9) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. सांगोला पोलिसांनी अवघ्या काही तासांत संशयित मुलाला ताब्यात घेतले. रमेश बटू कुं भार (वय 55) असे खून झालेल्याचे नाव आहे, तर अतुल कुंभार असे संशयिताचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी, वाकी (शिवणे) अंतर्गत असलेल्या पाटील मळा येथे राहणाऱ्या रमेश कुंभार यांचा त्यांच्याच शेतातील डाळिंबाच्या बागेत डोक्यात, तोंडावर व पायावर लोखंडी पाईपने मारून खून करण्यात आला. सांगोला पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने परिसराची तपासणी केली. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक विनोद घुगे, सहायक पोलिस निरीक्षक भारत वाघे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी मुलगा अतुल कुंभार याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला असून, त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत मयत रमेश यांची पत्नी समाबाई यांनी सांगोला पोलिसांत फिर्याद दाखल केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक भारत वाघे करत आहेत.

विसंगत माहितीमुळे खुन्याचा उलगडा

पोलिस तपास आणि चौकशी दरम्यान मुलगा अतुल याच्याकडून विसंगत माहिती समोर आली. तेव्हा पोलिसी खाक्या दाखवत अधिक चौकशी केली असता, हा खून आपणच केल्याचे अतुल याने सांगितले. वडील रमेश यांनी विविध ठिकाणांवरून कर्ज काढले आहे. शेतीही विकण्याचा घाट त्यांनी घातला होता. शिवाय आपल्या लग्नासाठी वडील कोणतेही प्रयत्न करत नाहीत. अशा विविध कारणांनी वैतागलेल्या अतुल याने वडिलांचा खून केल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news