Solapur theft: सोलार प्लांटमधील वायर चोरणारे जेरबंद

सोलार प्लांटमधून वायर चोरणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली
Solapur theft
Solapur theft: सोलार प्लांटमधील वायर चोरणारे जेरबंदPudhari
Published on
Updated on

सोलापूर : सोलार प्लांटमधून वायर चोरणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक भीमगोंडा पाटील हे अक्कलकोट विभागात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना माहिती मिळाली की, वायर चोरणारे दोघे त्यातील तांबे विकण्यासाठी गिऱ्हाईक शोधत आहेत. त्यानुसार त्यांनी कुंभारी ब्रिज येथून दोघांना ताब्यात घेतले. सागर गेनसिध्द माळी (वय 28) आणि अनिल प्रभाकार माळी (28, दोघे रा. लिंबीचिंचोळी, ता. दक्षिण सोलापूर) अशी दोघांची नावे आहेत. त्यांनी नोव्हेंबर 2025 मध्ये आचेगाव येथील टाटा सोलर प्लांट येथून वायर चोरी केल्याची कबुली दिली.

सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भीमागोंडा पाटील, सलीम बागवान, विजयकुमार भरले, सागर ढोरे पाटील, प्रमोद शिंपाळे, यश देवकते, समर्थ गाजरे यांनी पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news