

सोलापूर : सांगोला तालुक्यातील लोटेवाडी येथील दलित वस्तीच्या निधीत अपहार झाले आहे. त्याची फेर चौकशी करावे, यासाठी गेल्या सात दिवसापासून दादासाहेब सावंत यांनी जिल्हा परिषदेच्या समोर उपोषण सुरू केले होते.
त्याकडे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील अधिकार्यांनी दुर्लक्ष करत होते. मात्र, लोटेवाडी येथील ग्रामस्थांनी सोमवारी (दि.15) जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागास भेट दिल्यानंतर विभागाने फेर चौकशी करण्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे तब्बल सात दिवसानंतर समाजकल्याण विभागाच्या अधिकार्यांना जाग असल्याची प्रचिती सोमवारी जिल्हा परिषदेत दिसले.
लोटेवाडी येथील सावंत ते हेगडे वस्ती अंतर्गत रस्ता तत्कालीन सरपंच, ग्रामसेवकांनी मनमर्जीने रस्ता इतरत्र वगळून निधीचा अपहार केले आहे. त्याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी होऊन कारवाई करावी, यासाठी सावंत यांनी गेल्या सात दिवसापासून अन्न, पाणी त्याग उपोषण सुरू केले होते. मात्र, त्याची दखल समाजकल्याण विभागाने घेतली नव्हती.
मात्र, सोमवारी लोटेवाडी येथील ग्रामस्थ जिल्हा परिषदेत येऊन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी समाजकल्याण विभागातील अधिकार्यांशी संपर्क साधून चौकशीचे लेखी पत्र देण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे जिल्हा परिषदेत होणारा गोंधळ थांबला. अन्यथा ग्रामस्थ गोंधळ करण्याची तयारीत होते.