Solapur Drowning Incident : सीना नदीत बुडून दोघांचा मृत्यू

निमगाव (मा.) येथील घटना; गणेशोत्सवासाठी मुंबईहून आजोळी आले होते
Drowning Incident
Drowning Incident Pudhari Photo
Published on
Updated on

माढा : गणेशोत्सवासाठी मुंबईहून आपल्या आजोळी भोईंजे (ता. बार्शी) येथे आलेल्या पाच युवकांपैकी दोन युवक सीना नदीत पोहण्यासाठी गेले असता पाण्यात बुडाल्याची घटना शुक्रवारी निमगाव (मा.) येथील सीना नदीपात्रात घडली.

प्रफुल्ल गायकवाड (वय २५) आणि प्रतीक भालेराव (वय २३) अशी बुडालेल्या युवकांची नावे आहेत. मुंबई येथे वास्तव्यास असलेले हे युवक गणेशोत्सवासाठी आपल्या आजोळी भोईंजे येथे आले होते. शुक्रवारी प्रवीण गायकवाड (वय ३०), प्रफुल्ल गायकवाड (वय २५), प्रतीक भालेराव (वय २३), मंगेश अंधारे (वय २७) आणि पिल्या खंडागळे (वय १५) हे पाच युवक निमगाव (मा.) येथील सीना नदीवर पोहण्यासाठी गेले होते. पाचही जण नदीपात्रात पोहण्यासाठी उतरले असता प्रफुल्ल गायकवाड आणि प्रतीक भालेराव पाण्यात बुडाले. ही घटना लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. घटनेची माहिती प्रशासन व पोलिसांना देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, तहसीलदार संजय भोसले आणि माढा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रोहित शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. बुडालेल्या दोन्ही युवकांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून मोटरबोट मागविण्यात आली असून, शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. युवकांच्या नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली असून, प्रशासनाच्या मदतीने दोघांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news