Solapur Railway : आता सिद्धेश्वर, उद्यान एक्स्प्रेस मुंबईपर्यंत

दहा उन्हाळी विशेष गाड्या जुलै अखेरपर्यंत सुरू राहणार
Solapur Railway
Solapur Railway
Published on
Updated on

सोलापूर : मध्य रेल्वेच्या कर्जत - लोणावळा दरम्यानचा दक्षिण-पूर्व डाऊन मार्ग मंगळवार (दि. १४) रोजी पूर्ववत झाला. यामुळे सोलापूर विभागातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

यापूर्वी ७ जुलैला मध्य मार्गिका सुरू केली होती. दोन्ही मार्ग सुरू झाल्याने मुंबईकडे जाणाऱ्या प्रमुख गाड्या आता मूळ मार्गावरून धावणार आहेत. गाडी क्रमांक (११३०२) बंगळुरू-सीएसएमटी उद्यान एक्स्प्रेस व सिद्धेश्वर एक्स्प्रेस सोलापूर गाडी क्रमांक (१२११६) शुक्रवार (दि. १७) पासून सीएसएमटी मुंबईपर्यंत धावतील. तर गाडी क्रमांक ११३०१ सीएसएमटी मुंबई-बंगळुरू उद्यान एक्स्प्रेस शनिवार (दि. १८) पासून सीएसएमटी मुंबईवरूनच धावणार आहे.

शिवाय उन्हाळी सुट्टीतील गर्दीचा विचार करून या विभागातील अन्य १० विशेष गाड्यांना जुलै अखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यात सोलापूर-एलटीटी साप्ताहिक, सोलापूर-अनकापल्ले साप्ताहिक, सोलापूर-दौंड, सोलापूर-कलबुर्गी आणि हडपसर-हरंगूळ या दैनिक गाड्यांचा विशेषचा समावेश आहे.

सोलापूर विभागातील गाड्यांची स्थिती

l ११३०२ बंगळुरू-सीएसएमटी उद्यान एक्स्प्रेस : १७ पासून मुंबई

l १२११६ सोलापूर-सीएसएमटी सिद्धेश्वर एक्स्प्रेस : १७ पासून मुंबई

l ११३०१ सीएसएमटी-बंगळुरू उद्यान एक्स्प्रेस : १८ पासून मुंबई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news