Solapur News: टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला श्रीफळ हंडी सोहळा

अरणमध्ये संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी
Solapur News: टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला श्रीफळ हंडी सोहळा
Published on
Updated on
युवराज रणसिंग

मोडनिंब : ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष, टाळ-मृदंगाचा गजर आणि वारकऱ्यांच्या उत्साहात संत शिरोमणी सावता महाराज यांच्या अरणमध्ये (ता. माढा) बुधवारी श्रीफळ हंडी सोहळा चांगलाच रंगला. ७३१ व्या पुण्यतिथीच्या या सोहळ्यासाठी जिल्ह्यासह राज्यातील भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

जगद्‌गुरू तुकाराम महाराज यांचे वंशज बाळासाहेब महाराज देहूकर यांच्या घराण्याला श्रीफळ हंडी फोडण्याचा मान आहे. या परंपरेनुसार बाळासाहेब देहूकर व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी श्रीफळ हंडी फोडली. यावेळी काल्याचे कीर्तनही झाले.

पंढरपूर येथून आलेली विठुरायाची पालखी व संत सावता महाराज यांच्या पालखीसमोर श्रीफळ हंडी सोहळा रंगला. दहीकाल्याच्या हंडीभोवती भाविकांनी श्रद्धेने तर काहींनी नवसाचे नारळ बांधले. हरिभाऊ गिड्डे, नागनाथ गिड्डे या मानकऱ्यांच्या घरून समारंभपूर्वक हंडी आणून पारावर बांधण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news