Solapur News : श्री अर्धनारी नटेश्वर यात्रेला आजपासून दिमाखात सुरुवात

काशिनाथ आडत यांच्या खांद्यावर उत्सवाची धुरा; धार्मिक, सांस्कृतिक, बैलगाडा शर्यतीची मेजवानी
Shri Ardhanari Nateshwar Yatra
Shri Ardhanari Nateshwar Yatra
Published on
Updated on

वेळापूर : वेळापूर नगरीचे आराध्य दैवत व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री अर्धनारी नटेश्वराच्या यात्रेच्या सोहळ्यास आज दि. 23 मार्चपासून अत्यंत दिमाखात सुरवात होत आहे. विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम पार पडत आहेत. यात्रेच्या यशस्वीतेसाठी काशिनाथबापू आडत यांची यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावर्षीचा मानाच्या पूजेचा बहुमान गंगाधर होडगे यांना देण्यात आला आहे. संपूर्ण गाव या सोहळ्यासाठी सज्ज झाले आहे.

वेळापूर नगरीचे आराध्य दैवत व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री अर्धनारी नटेश्वराच्या यात्रोत्सवाचे नियोजन मोठ्या उत्साहात आमदार उत्तमराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री अर्धनारी नटेश्वर मंदिर आवारात पार पडले. पाडव्याच्या मुहूर्तावर पार पडलेल्या या बैठकीत उत्सवाचा आराखडा तयार करण्यात आला.

यंदाची यात्रा केवळ धार्मिक विधींपुरती मर्यादित न राहता, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनी नटलेली असेल. यामध्ये प्रामुख्याने साहसी खेळ, थरारक अशा बैलगाडी स्पर्धा हे यात्रेचे मुख्य आकर्षण असणार आहेत. महिलांसाठी खास सोय म्हणून होम मिनिस्टर सारख्या कार्यक्रमातून महिलांच्या कलागुणांना वाव दिला जाणार आहे. सांस्कृतिकमध्ये रात्रीच्या वेळी भव्य दारूकाम आतषबाजी व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था यात्रा कमिटी ग्रामस्थ यांच्या वतीने केली आहे. या उत्सवाच्या नियोजनासाठी अध्यक्षपदी काशिनाथ आडत, उपाध्यक्ष ॲड. विठ्ठल मंडले, रणजित साठे, कार्याध्यक्ष अमोल मंडलिक, खजिनदार दादा तुपे, सचिव अभिजित साठे, सरचिटणीस विनायक भगत, सेक्रेटरी विजय पवार यांच्या निवडी करण्यात आल्या.

या बैठकीला सरपंच रजनीश बनसोडे, उपसरपंच नानासाहेब मुंगुसकर, मिलिंद सरतापे, अशोकराव माने देशमुख, दादा राजे घाडगे, संजय मंडले, मनोहर माने, अमृतराव माने देशमुख, डॉ. शिवाजी पनासे, हनमंत वायदंडे, महादेव म्हेत्रे, संजयकाका देशपांडे, जवान माने-देशमुख, युवराज मंडले, शंकर आडत, अभिजित साठे, अमोल पनासे, सूर्यकांत मोहिते, राहुल सराटे, वैभव बनसोडे, प्रदीप सरवदे, रणजित सरवदे, ग्रामविकास अधिकारी कैलास सुरवसे, पुजारी गौरीहर गुरव, रविराज गुरव, सतीश गुरव, महेश स्वामी, विवेक जोशी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news