Solapur News : अभिषेक घालून श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेस सुरुवात

मानाच्या पालखीचे, ज्योतीच्या आगमन; देवीच्या मंदिरात नारळ फोडण्यास मनाई
Solapur News
अभिषेक घालून श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेस सुरुवात
Published on
Updated on

पिलीव : पिलीव येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेस कमिटीचे वतनदार किशोर जावळे व कांचन जावळे यांच्या हस्ते सपत्नीक विधिपूर्वक महाअभिषेक घालून यात्रेस प्रारंभ करण्यात आला.यात्रा निर्वीघ्नपणे पार पाडून भावीक भक्तांची यात्रा सुखकर व्हावी. नागरिकांना सुख शांती, प्रपंचात बरकत व्हावी. सौख्य लाभावे. दुष्काळ नष्ट व्हावा, भरपूर प्रमाणात पाऊस पडावा म्हणून श्री महालक्ष्मीला साकडं घालण्यात आले.

दरम्यान, श्री महालक्ष्मी देवीच्या सजवलेल्या पालखीची पिलीव पेठेतून वाजत गाजत, पोतराजी नृत्य, देवीची गाणी म्हणत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मानकरी परिट समाजाच्यावतीने देवीच्या पालखी समोर कापडाच्या पायघड्या घातल्या. तर मानकरी कपने, मदने, मेटकरी, सोलंकर यांनी ढोलताशांच्या वाद्याच्या गजरात मानाच्या काट्या मिरवणुकीत घेऊन सहभागी झाले होते.

तसेच आटपाडी तालुक्यांतील खरसुंडी येथून सिध्दनाथाची पेटतीज्योत आणण्यात आली. यावेळी श्री महालक्ष्मी देवीचे पुजारी शिवाजीआप्पा शेंडगे, शंकर शेंडगे, दादासाहेब वगरे, योगेश शेंडगे यांनी स्वागत केले. श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेस माघ पौर्णिमेपासून सुरुवात करण्यात आली. यावेळी यात्रा परिसरात छोटे-मोठे उद्योग व्यवसाय, हॉटेल, रसपानगृह, खानावळी, पाळणे, मनोरंजनाची साहित्य, खेळण्याची दुकाने, मेवा मिठाईच्या दुकाने, स्टेशनरी आदींच्यासाठी जागा वाटप करण्यात आले.

श्री श्री सदगुरु साखर कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज तसेच शासनाच्या वतीने पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची सोय करण्यात आली. महावितरणच्यावतीने 24 तास लाईटची सोय करण्यात आली आहे. देवीचे दर्शन व यात्रा सुखकर व्हावी म्हणून माळशिरस तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास दिंडोरे, प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार सुरेश शेजुळ, गटविकास अधिकारी पवार नियंत्रण करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news