Solapur News : श्री दिगंबर जैन गुरुकुलला ‌‘ए प्लस‌’ दर्जा प्राप्त

सोलापुरातील एकमेव शाळा; राज्यातील 429 शाळांना ‌‘+‌’ श्रेणी
 Solapur News
श्री दिगंबर जैन गुरुकुलला ‌‘ए प्लस‌’ दर्जा प्राप्त
Published on
Updated on

सोलापूर ः शहरातील श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाला ‌‘ए प्लस‌’ हा दर्जा प्राप्त झाला. स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड ॲश्युरन्स फ्रेमवर्क अंतर्गत हे गुणांकन करण्यात आले. ए प्लस असा दर्जा असलेल्या राज्यातील निवडक शाळांमध्ये जैन गुरूकुल या सोलापुरातील एकमेव शाळेचा समावेश झाला आहे.

या यशामागे संस्थेच्या व्यवस्थापनाची दूरदृष्टी, शिक्षकवर्गाची निष्ठा आणि विद्यार्थ्यांची मेहनत यांचा सुसंवाद आहे. वालचंद शिक्षण समूहाचे अध्यक्ष अरविंद दोशी, मानद सचिव डॉ. रणजित गांधी, विश्वस्त भूषण शहा, पृथ्वीराज गांधी, वैभव गांधी, पराग शहा तसेच समस्त विश्वस्तांनी संस्थेला सक्षम नेतृत्व दिले. मुख्याध्यापक राजकुमार काळे म्हणाले, आजचे यश गुरुकुल परिवाराच्या परिश्रमांची पावती आहे. हा मान आमच्यासाठी केवळ सन्मान नाही, तर अधिक जबाबदारीची जाणीवही आहे. गुणवत्तापूर्ण आणि संस्कारप्रधान शिक्षण देण्याची आमची परंपरा यापुढेही अधिक सक्षमपणे जोपासली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news