Shaktipeeth Highway : संमतीविना जमीन मोजणी नाहीच

महाविकास आघाडीतील नेत्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Shaktipeeth Highway : संमतीविना जमीन मोजणी नाहीच
Published on: 
Updated on: 

सोलापूर : शेतकऱ्यांची कोणतीही संमती नसताना शक्तीपीठ महामार्गासाठी सक्तीने आणि पोलिस बळाचा वापर करून जमीन मोजणी केली जात आहे. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

सोलापूर येथे आ. जयंत पाटील, काँग्रेसचे नेते सतेज पाटील, खा. धैर्यशील मोहिते-पाटील, खा. प्रणिती शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांनी एकत्रित येत जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांची भेट घेऊन सक्तीची मोजणी तत्काळ थांबवण्याची मागणी केली.

शेतकऱ्यांची संमती नसताना शेकडोंच्या संख्येने पोलिस पाठवून दबाव आणला जात आहे. शेतकऱ्यांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ आली तरी पोलिस आणि महसूल यंत्रणा दाद देत नाही, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांनी महसूल कर्मचाऱ्यांना केवळ संरक्षण द्यावे, मात्र शेतकऱ्यांवर हात उचलू नये, असे आ. जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. राज्य सरकार दुष्काळ निवारणासाठी निधी देण्याऐवजी शक्तीपीठ महामार्गावर तब्बल ८६ हजार कोटी रुपये खर्च करत असल्याचा आरोप करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news