

सोलापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या पंधरा दिवसात शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी धडक कारवाई केली. यामध्ये अवैध देशी, विदेशी मद्य व हातभट्टी दारु जप्त करुन एकूण एक कोटी 11 लाख 83 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
विभागीय उपायुक्त सागर धोमकर, सोलापूर अधीक्षिका भाग्यश्री जाधव, उपअधीक्षक जे. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 15 ते 30 डिसेंबर दरम्यान शहर व जिल्ह्यात अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रांवर, अवैध देशी, विदेशी मद्य विक्री व वाहतुकीवर धडक कारवाई केली. यामध्ये 200 गुन्हे दाखल करुन 225 जणांवर कारवाई करण्यात आली. सदर कारवाईत 24 वाहनांसह एकूण रूपये 1 कोटी 11 लाख 83 हजार 915 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई निरीक्षक आर. एम. चवरे, ओ. व्ही. घाटगे, राकेश पवार, पंकज कुंभार, सचिन भवड, एस. डी. कांबळे, सचिन शिंदे, समाधान शेळके, मुकेश चव्हाण, संजय चव्हाण, आण्णा करचे, नंदकुमार वेळापुरे, वसंत राठोड, चेतन व्हनंगुटी, प्रशांत इंगोले, अनिल पांढरे, विनायक काळे, अण्णासाहेब फड, कपिल स्वामी यांनी पार पाडली.
दरम्यान, हिवरे येथे गोवा बनावटीचा विदेशी मद्यसाठा 153 लि. व 27 लि. बनावट देशी मद्यसाठा तसेच विविध ब्रँडचे बनावट बूचसह एकूण दोन लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.